महाराष्ट्र न्यूज/ फलटण प्रतिनिधी : माहेर वरून पैसे आणण्यासाठी मारहाण केल्याची आणि घरातून हाकलून दिल्याबद्दल फिर्याद लटण ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता हर्षद मोरे, वय 21, व्यवसाय घरकाम, मूळ रा. मोरेवाडी, मूर्ती मोडवे, ता. बारामती जि.पुणे सध्या रा. दुधेबावी, ता. फलटण जि. सातारा हिने फिर्याद दिली आहे. सौ.अंजली दशरथ मोरे, दशरथ आप्पा मोरे, हर्षद दशरथ मोरे, पंकज मोरे सर्वजण रा. मोरेवाडी ,मूर्ती मोडवे, ता. बारामती जि. पुणे यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. 6 एप्रिल 19 रोजी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. घरातील कामे येत नाही म्हणून घालून पाडून बोलणे तसेच उपाशी ठेवणे असेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. 20 ऑगस्ट 21 रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार लिमण पुढील तपास करीत आहेत.