आताच्या कोरोना या महामारीमुळे पूर्णपणे जनजीवन विस्कळीत झाले असताना. याच्या मध्ये बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत लोकांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक लोक भाडे तत्वांवर राहत आहे. त्यामध्ये काही घर मालक भाडेकर ना नाहक त्रास देत आहेत “कोणी घर देता का घर”असे म्हणण्याची वेळ आज एका वरती आली आहे .प्रकाश पवार हा बरेच वर्षे झाले श्री नाना नेवसे हिलटॉप कॉलनी चार भिंती यांच्या कडे भाडेकरू म्हणून राहत आहे.परंतु प्रकाश पवार हा रुग्णवाहिका चालक म्हणून काम करीत आहे. आता सध्या या रोगामुळे सर्व उदरनिर्वाह बंद आहे. त्या मध्ये अश्या घरमालकानी त्याच्या मागे पैसे साठी तगादा लावला आहे .नाही तर रूम खाली कर अन्यता सामान बाहेर फेकून देईन आणि गेली 4 दिवस पासून लाईट पाणी बंद केले असल्याने प्रकाश पवार यांनी आज पोलीस निरीक्षक सातारा यांच्या नावे अर्ज केला आहे.