महाराष्ट्र न्यूज बारामती प्रतिनिधी
बारामतीत काल घेतलेल्या नमुन्यांपैकी उर्वरित पाच नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यामध्ये 3 निगेटिव व दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये बारामती शहरातील खंडोबा नगर येथील 32 वर्षीय युवक व कणेरी येथील पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील 46 वर्षीय पुरुष व सकाळचे चार असे एकूण आज दिवसभरात सहा रुग्ण कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. अशी माहिती प्रशासनाने दिली.