संतोष भोसले
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी
वडगाव निंबाळकर, दि.23
मेंढपाळाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा. अन्यथा सकल धनगर समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला.
करमाळा जि. सोलापुर येथिल तहसीलदार आणि पोलिस ठाणेमध्ये समाजाच्या वतिने मंगळवार दि.23 निवेदन दिले. मयत मेंढपाळ रावा शिवा नरूटे मेंढ्या चारण्यासाठी जात असताना हिंगणी ता. करमाळा येथे 19 ऑक्टोबर 2018 रोजी बाळू उर्फ बाळासाहेब यांनी पडीक जमिनीत बकरी चारली म्हणून बेदम मारहाण केली होती. यामध्ये गंभीर जखमी झालेले रावा शिवा नरोटे हे मारहाण झालेल्या दिवसापासून 7 एप्रिल 2020 पर्यंत दवाखान्यात विविध ठिकाणी उपचार घेत होते दरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यु झाला मारहाण केल्याने मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या बाळू बाबर यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, आरोपीचा जामीन रद्द होऊन तात्काळ अटक व्हावी सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करावा, नरोटे कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनाचा विचार न झाल्यास पंधरा दिवसात महाराष्ट्रातील सकल धनगर समाज व मेंढपाळ संघर्ष समिती यांच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला. याप्रसंगी धनगर समाजाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके, उज्वला अभय हाके, सचिन मलगुंडे, राम शिंदे, सुरज खोमणे, शिवराज पुकळे, सदाशिव कारंडे, खंडु माने, सत्यवान हांडे आदी उपस्थित होते.