महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी (इंदापूर) : शहाजीराजे भोसले
दि . 21/09/2020 रोजी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची संचालक मंडळाची मासिक मिटिंग आयोजित करण्यात आली होती.सदर मिटिंग मध्ये मा.चेअरमन श्री पृथ्वीराज जाचक यांना कोणतेही पद नसताना संचालक नसताना राजकीय फायद्यासाठी सभेमध्ये बसविण्यास बेकायदेशीर परवानगी देन्यात आली.त्याविरोधात आज मा.संचालक व संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष श्री तानाजी(बापू) थोरात व बारामती तालुका भाजपचे तालुका अध्यक्ष श्री पांडुरंग मामा कचरे यांनी चेअरमन व संचालक यांना जाब विचारला.कोणतेही मान्यता नसताना आपण कोणालाही संचालक मंडळाच्या मीटिंग ला उपस्थित राहू शकत नाही.
कालपर्यंत संचालक मंडळाने कारखान्याचे वाटोळ केले असे म्हणत असताना तेच आज अचानक मांडीला मांडी लावून का बसत आहात?? पृथ्वीराज जाचक हे कारखान्याची बदनामी करत आहेत असे सांगणारे चेअरमन श्री काटे यांना आज अचानक जाचक चांगले कसे वाटू लागले ? तुम्हाला वाटलं की आत या म्हणायचं आणि इतर वेळी बाहेर काढायचं हे कसं काय?कालपर्यंत एकमेकांबरोबर भांडणारे स्वतःच्या राजकीय हितासाठी एक कसे होतात.छत्रपती चा होणारा राजकीय अड्डा या वेळी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांने हाणून पाडला.
आगामी छत्रपतीचा आखाडा कोणी कोठेही गेले तरी भा.ज.पा ने छत्रपतीच्या हिताकरिता हीच भूमिका घेऊन मैदानामध्ये उतरून जशास तसे उत्तर देण्यास तयार असल्याचे दिसून आले.कारखान्याचे सर्वेसर्वा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणिपृथ्वीराज जाचक यांची छत्रपतीच्या कारखान्यामध्ये होणारी मनमानी भाजप कार्यकर्त्यांनी हाणून पाडली.पृथ्वीराज जाचक हे स्वतःची राजकीय पोळी भाजली की छत्रपती च्या हीताकडे दुर्लक्ष करून ज्यांनी आजपर्यंत कारखान्याचे वाटोळे केले त्या कंपूत सामील झाले त्यामुळे छत्रपती च्या सभासदांमध्ये प्रचंड असंतोष दिसून येत आहे. येणाऱ्या निवडणुकीत छत्रपती चा स्वाभिमानी सभासद जचकासह सर्व संचालक मंडळ यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. याप्रसंगी पुणे जिल्हा निमंत्रित सदस्य भाजपा मा.सरपंच लालासाहेब सपकळ व तानाजी (बापू) थोरात , मा.संचालक,श्री छत्रपती स.सह. सा. कारखाना व पांडुरंग कचरे , अध्यक्ष-भारतीय जनता पक्ष बारामती तालुका आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते सभासद उपस्थित होते.