महाराष्ट्र न्यूज बारमती प्रतिनिधी
राज्यातील दहावीच्या परिक्षेत उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्यामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारामती तालुक्यातील पारवडी या गावातील गुरव कुटुंबियात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित झाला आहे. त्याचे कारण असे आहे कि, या कुटुंबातील मुलगा व आई हे दोघे दहावीची परीक्षा एकाच वेळी उतीर्ण झाल्याची दुर्मिळ घटना बारामती तालुक्यातील पारवडी गावत घडली आहे. वयाच्या 36 व्यावर्षी आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांन्त परिक्षा मध्ये 64.40 टक्के गुण मिळवत पास होण्याचे आपले अपुर्ण असलेले स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांचा मोठ मुलगा सुद्धा दहावीच्या परिक्षेत 73.20 टक्के गुण मिळवुन पास झाला आहे. त्यांच्या सोबत उत्तीर्ण झालैला त्यांचा मूलगा सदानंद हा आपल्या आईला अवघड गणितं, इंग्रजी, आणि विज्ञान विषयाचा अनाकलनीय भाग समजावून सांगत असे, वर्षभर सदानंद हा मुलगा आपल्या आईचा शिक्षकच बनला होता. त्यामुळे त्याचाही अभ्यास चांगला झाला. आई स्वयंपाक करताना आई शेजारी बसून जेवणारी दोन्हीही मुलं आईला परिक्षेसाठी मार्गदर्शन करत असे. यापुढे बारावीची परिक्षा उत्तीर्ण होऊन मोठी पदवी मिळवण्याची त्यांची महत्वकांक्षा आहे.
बारामती तालुक्यातील पारवडी येथील बेबी गुरव या बारामती एमआईडीसी मधील बारामती टेक्सटाईल या पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करण्याची नोकरी करतात. त्यांचे बारामती तालुक्यातील शिर्सुफळ हे गांव माहेर आहे. माहेरी वडिलांच्या वेडसरपणामुळे कौटोंबिक व कारणामुळे त्याना दहावीची परीक्षा देऊन पास होण्याची महत्वकांक्षा पूर्ण होऊ शकली नाही. त्यांचा मुलगा सदानंद गुरव हा शेटफळगढ़े येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालया मध्ये दहावीचे शिक्षण घेत होता. तर त्यांचा धाकटा मुलगा हा इयत्ता आठवी मध्ये शिकत होता. त्यांनी त्यांच्या पतीच्या आग्रहास्तव दहावीची परिक्षा देण्याचा महत्व पूर्ण असा निर्णय घेतला. त्यांचे पती हे एका नामांकित वृत्तपत्र समुहाकडे पत्रकारितेचे काम करतात. त्यांनी त्यांना प्रोत्साहन देत त्यांचा आत्मविश्वास वाढवला. त्यांनी बांदलवाडी ता.बारामती येथिल बालविकास विद्यालयातून बहिस्थ विद्यार्थी व परिक्षार्थी अर्ज भरला.त्या दररोज सकाळी घरकाम आटोपून आठ वाजता बारामती टेक्सटाईल पार्कमधील कपंनीत काम सुरू होईपर्यंत कंपनीच्या आवारात अभ्यास करत असत, तर कामावरून सुटल्यावर त्या घरी जाण्यासाठी बसस्टाॅप बसची वाट पाहत असताना सुद्धा त्यांचा अभ्यास सुरूच असायचा, त्या घरातून निघतना न विसरता दररोज आपल्या पर्समध्ये पुस्तक घेऊनच कामावर पोचत असत, दिवसभराच्या काबाडकष्टानंतर देखील त्या रात्री घरकामातून वेळ मिळताच अभ्यासात लक्ष घालत असत. त्यांनी त्यांना दहावीती मिळालेल्या यशाबद्दल आनंद व समाधान व्यक्त केले आहे.