टॉप 10 मध्ये मुलींचीच आघाडी
महाराष्ट्र न्यूज :- राहुल ताटे पाटील
98.60 % आणि गणित विषयांमध्ये 100 पैकी 100 मार्क मिळवून कु.साक्षी गोपाळ शिंदे प्रथम.
मार्च महिन्यामध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचे वेळेस कोरोना परिस्थितीमुळे एक पेपर बाकी राहिला , पण विद्यार्थ्यांच्या त्या विषयाच्या पहिल्या सत्र च्या मार्क वरून सरासरी गुण देण्यात आले, आणि प्रलंबित असणारा दहावीचा निकाल आज जाहीर झाला.अनेक विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने झाला यश संपादन केले असून या वेळेसही मुलींनीच बाजी मारलेली दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील तासगाव ता सातारा येथील संजय भैरवनाथ काळे विद्यालयातील यावर्षीचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयामध्ये मुलींनी चांगले यश संपादन केले आहे.
यामध्ये अनुक्रमे
1) कु.साक्षी गोपाळ शिंदे – 98.20%,
2) कु.प्राजक्ता सुनील चव्हाण-91.60% ,
3) कु.सानिया राजाराम धनवे-91.00%,
4) कु.वेदांतिका विजय काळे-87.40%,
5) कु.हर्षदा जगन्नाथ घोरपडे-86.80%,
6) कु.प्रतीक्षा दिनेश धोंडवड-86.60%,
7) कु.सृष्टी संतोष गौंड-86.00%,
8) कु.आरती सुनिल पवार-85.80%,
9) कु.ऋतुजा संजय चव्हाण-85.60%,
10) कु.सुहानी चंद्रकांत जाधव-85.40%.
या मुलींनी विशेष यश संपादन केल्याबद्दल केले त्यांचे विद्यालयातील मुख्याध्यापक श्री घाडगे, पर्यवेक्षक, वर्गशिक्षक सर्व शिक्षक, तसेच तासगाव मधील स्थानिक स्कूल कमिटी, ग्रामस्थ, स्वराली कॉम्प्युटर सेंटर इत्यादींनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.