फलटण : सन 2017-2018 मधील थकीत बिलाची रक्कम दिल्याशिवाय साखरवाडी, ता. फलतण येथील श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साखर कारखाना यंदाचा गळीत हंगामात सुरू करून दिला जाणार नाही असा इशारा फलटण तालुका शेतकरी शेतकरी संघटने मार्फत कारखान्याला देण्यात आला आहे.
संघटनेमार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनामध्ये सांगण्यात आले आहे की, न्यू फलटण शुगर वर्क्स, साखरवाडी हा साखर कारखाना आपण श्रीदत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने विकत घेऊन चालवत आहात. परंतु सन 17-18 सालच्या गाळप हंगामात कारखान्याला ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची थकीत बिलाची रक्कम अद्याप देण्यात आलेले नाही. टिबली तिने आपल्यावर बंधनकारक आहे. तरी यावर्षी गाळप हंगामसुरु करण्यापूर्वी संबंधितांना ती बिले देण्यात यावीत देण्यात यावीत. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि थकीत बिल शेतकरी हा साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही असे, कारखान्याला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. या देण्यात आलेल्या निवेदनावर धनंजय महामुलकर यांच्यासहित फलटण तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्य यांच्या स्वाक्षर्या आहेत.

















