Homeजिल्हाविषयकराज्यमंत्र्यांचे हस्ते कळंब येथील आयोजित हायमास्ट दिवे उदघाटन समारंभ रद्द ;कोरोनाकाळात उदघाटन घेतलेस निदर्शन करण्याचा प्रदिप पाटील यांचा इशारा
राज्यमंत्र्यांचे हस्ते कळंब येथील आयोजित हायमास्ट दिवे उदघाटन समारंभ रद्द ;कोरोनाकाळात उदघाटन घेतलेस निदर्शन करण्याचा प्रदिप पाटील यांचा इशारा
महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले : (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील कळंब येथील जिल्हा परिषदेच्या दलित वस्ती सुधार योजना २०१९/२० या निधीतून मंजूर करण्यात आलेले हायमास्ट दिवे , यातील काही दिवे मंजूर ठिकाणी न बसविता इतरत्र ठिकाणी बसविण्यात आले असल्याने त्या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे लेखी तक्रार करणार असल्याचे प्रदिप पाटील यांनी सांगितले .
रविवार , दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वा. कळंब येथील चौकात बसविण्यात आलेल्या हायमास्ट दिव्याचा शुभारंभ राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला होता . कळंब – वालचंदनगर परिसरात कोरोनाच्या पार्श्वभूमी वर कन्टोंमेंट व काही ठिकाणी बफर झोन वालचंदनगर पोलीस ठाण्याकडून घोषीत करण्यात आला आहे. त्या मुळे परिसरातील व्यवसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती .
२८ ऑगस्ट रोजीच ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांची मुदत संपली आहे . तरी देखील ग्रामपंचायत प्रशासनाने स्वतःची व इतरांची नांवे उदघाटनाच्या बोर्डावर टाकलेली आहेत . ग्रामपंचायतची मुदत संपलेली असल्याने व दि.१ सप्टेंबर २०२० पासून ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नेमणूक झाली असल्याने , ३० ऑगस्टला उदघाटनासाठी लावण्यात आलेल्या बोर्डाचे उदघाटन प्रशासनाने घेतलेस तीव्र निदर्शन करणार असल्याचा इशारा कळंबचे माजी सरपंच , इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती व भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील यांनी दिला आहे .