महाराष्ट्र न्यूज सोमेश्वरनगर प्रतिनिधी
लोकनेते म्हणून सर्वांचे परिचित आणि सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने( बारामती)चे मा. अध्यक्ष बाबालालजी काकडे यांची आठवी पुण्यतिथी म्हणून गेले आठ वर्षे दर वर्षी मु सा काकडे महाविद्यालयात आयोजन करीत असतात. मु.सा. काकडे महाविद्यालयात त्यांच्या प्रतिमेलाम हाविद्यालयाचे अध्यक्ष सतिश काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे, भीमराव बनसोडे, प्रा रवींद्र जगताप, पत्रकार मित्र तसेच प्राध्यापक वर्ग उपस्थित होता काकडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. दि ३१ जुलै रोजी प्रा. एम बी जगताप, प्रा. के डी जगताप व प्रा. राणी शेंडकर तर दि १ ऑगस्ट रोजी डॉ जगन्नाथ साळवे, प्रा डॉ देविदास वायदंडे आणि डॉ एस पी जाधव यांचे तर दि २ रोजी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सोमप्रसाद केंजळे आणि प्रा रवींद्र जगताप यांचे व्याख्यान पार पडले .
या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सतीश काकडे बोलताना म्हणाले की बाबालालजी काकडे हे सर्वसामान्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नये तसेच त्यांच्या मदतीला धावून जाणे व सर्वांना एक समान वागणूक अश्या स्वभाचे असून असा लोकनेता पुन्हा होणे नाही असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रस्तावित प्रा. प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. तर आभार प्रा श्रीकांत घाडगे यांनी मानले.






















