दिशा वेलनेस सेंटर च्या फिटनेस कॅम्प ला उस्फूर्त प्रतिसाद ……
वाई :- सध्याच्या धकाधकीच्या जीवनात हवा, पाणी, अन्न प्रदूषित झाले आहे. यामुळे अनेक आजार होत असून वेळ आणि पैशाचा अपव्यय होऊन मानसिक त्रास होत असतो. दिशा वेलनेस सेंटर मध्ये नियमित वर्कआऊट केल्यास निरोगी जीवन जगू शकता आणि निरोगी जीवन हे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे असे मत दिशा वेलनेस सेंटरचे संचालक डॉ. नितीन कदम यांनी मार्गदर्शन करताना केले. दिशा वेलनेस सेंटर द्वारे वाई येथील साठे मंगल कार्यालयामध्ये आयोजित मोफत फिटनेस कॅम्पला वाईकरांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. हा ट्रान्सफॉर्मेशन वरकाऊट खास वेटलॉस्ट आणि फिटनेस आयोजित केला होता. यामध्ये पाचशे लोक या सकाळी सहा ते आठ यावेळेत उपस्थित होते ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी विशेष करून नगर जिल्ह्यातून भारतातील नंबर वन वेलनेस कॉच अर्जुन सुसे, रवींद्र वेताळ आणि त्यांची टीम उपस्थित होती यावेळी १०२ वजन असलेल्या रेणुका काळे यांनी याच्या माध्यमातून 48 किलो वजन कमी केली त्यांनी ही उपस्थित राहून प्रेझेंटेशन केले. अर्जुन सुसे यांनी संपूर्ण वरकाऊट आणि डायट याबद्दलची माहिती दिली त्यांनी आपण आपल्या बॉडी स्ट्रक्चर मध्ये कसे ट्रान्सफर मिशन करू शकतो याबाबत प्रेझेंटेशन दिले. यावेळी डॉ. नितीन कदम, रुपाली कदम कृष्णा सेवाकार्य समितीचे सदस्य, पतंजली योग समितीचे सदस्य दिशा अकॅडमी चे शिक्षक-विद्यार्थी वाईकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
































