११विरुद्ध ३ मतांनी विजयी
पुसेगाव : खटाव तालुक्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राजकीयदृष्टया महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या बुध . ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जनशक्ती विकास पॅनेलचे अभयसिंह उदयसिंह राजेघाटगे यांची ११विरुद्ध ३ मतांनी विजयी झाले . आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्व मानणाऱ्या या ग्रामपंचायतीत लोकनियुक्त माजी सरपंच अभयसिंह राजेघाटगे यांच्या नेतृत्वाखालील जनशक्ती विकास पॅनेलच्या लोकनियुक्त सरपंच सौ . सुजाता दत्तात्रय बोराटे व . दहा ग्रामपंचायत सदस्य निवडून आले होते . तर विरोधी लोकसेवा विकास पॅनेलला तीन जागा मिळाल्या होत्या . तर अन्य दोन पॅनेलचा दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते . आज सरपंच सुजाता बोराटे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचीत सदस्यांची सभा झाली . यावेळी जयवंत आनंदराव जगदाळे , शारदा शिवाजी कचरे, सुमेधा अजित घाटगे , हरिदास कांतीलाल जाधव ,रेश्मा राहुल खवळे, मनिषा मुरलीधर चव्हाण , राजुल रामचंद्र बोराटे , उज्वला शशिकांत घाटगे , दिपाली नागनाथ कुंभार, अभयसिंह उदयसिंह राजेघाटगे , विवेक रघुनाथ जगदाळे , प्रशांत विजय खराटे ,प्राजक्ता ऋुतुराज कदम उपस्थित होते . निवडणूक निरीक्षक म्हणून दळवी , तलाठी ढोले , ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी काम पाहिले . यावेळी उपसरपंचपदासाठी झालेल्या मतदानात अभयसिंह राजेघाटगे यांना ११ मते तर प्राजक्ता कदम यांना ३ मते पडली . त्यामुळे . अभयसिंह राजेघाटगे यांना विजयी घोषीत करण्यात आले . या निवडीबद्दल त्यांचे आमदार महेश शिंदे , डॉ . अरूणाताई बर्गे , डॉ . प्रियाताई शिंदे , श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव , भरत मुळे , सरपंच सुजाता बोराटे , माजी उपसभापती लहुकुमार मदने , माजी सरपंच नवनाथ फडतरे , हणमंत शिंदे , ग्रामस्थ , ग्रामपंचायत सदस्य व जनशक्ती विकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले .