बारामती प्रतिनिधी
बारामती मधील नागरिकांना विश्वासात न घेता बारामती नगरपालिकेने १८ मार्च २०२० रोजी घरकुला संदर्भात एक ठराव पास केला होता. त्यास ठरावास वित्तीय संमती देण्यात आली आहे. ही बाब बारामती येथील सामाजिक कार्यकर्तेेेे सचिन जगताप यांच्या निदर्शनास आल्यानंतर ते बारामती इंदापूर रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक येथे तीन दिवस आमरण उपोषणास बसले होते. तिसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना रात्री उशिरा बारामती नगरीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी उपोषण स्थळी जावुन भेट दिली. व घरकुला संदर्भातील सर्व नागरिकांना विश्वासात घेतले जाईल, याची खबरदारी बारामती नगरपालिका घेणार आहे. असे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जगताप यांनी सांगितले.
बारामती शहर झोपडपट्टी विरहित करण्याच्या दृष्टीने बारामती नगरपालिकेने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत काम करण्यास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे. त्यानुसार लाभार्थ्यांच्या याद्या ही निश्चित करण्यात आल्या असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे. याबाबत १८ मार्च २०२० रोजी बारामती नगरपालिकेने ठराव मंजूर करून त्यास वित्तीय मंजूरी दिली आहे.
सदरचा ठराव करीत असताना बारामती शहरातील नागरिकांना यामध्ये कोणत्याही प्रकारे बारामती नगरपालिकेने विश्वासात न घेता बारामती नगरपालिकेने परस्पर ठराव मंजूर केला होता. त्यामुळे या ठरावाच्या विरोधात बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जगताप यांनी बारामती नगरपालिकेच्या ठरावाच्या विरोधात ३० जुलै पासून आमरण उपोषणास सुरु केले होते. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी जगताप यांची प्रकृती खालावल्याची बातमी बारामती मध्ये सर्वत्र पसरली त्यामुळे बारामती मधील नागरिकांनी उपोषण स्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून बारामती नगरीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी दि. १ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा घटनास्थळी जाऊन उपोषण कर्ते जगताप यांची भेट घेऊन नागरिकांना विश्वासात घेऊन घरकुला संदर्भात काम केले जाईल, असे लेखी पत्र देऊन उपोषण मागे घेण्यासाठी विनंती केल्यानंतर सदरचे उपोषण स्थगित करण्यात आले.






















