उंब्रज-प्रतिनिधी
मदत रक्ताची संघटना महाराष्ट्र राज्य चे संस्थापक आणि उंब्रज मधील सामाजिक कार्यकर्ते परेशकुमार कांबळे यांना बिकानेर राजस्थान येथे ग्लोबल ह्युमीनिटी चेंज मेकर 2023 हा पुरस्कार प्रदान करण्यात आला ,आपल्या सामाजिक कार्याने देशभरात आपले व उंब्रज गावचे नाव गाजवत असलेले उंब्रज चे सुपुत्र परेशकुमार कांबळे हे गेली 12 वर्षे रक्तदान या सामाजिक कार्यात काम करत आहेत , कित्येक गरजू रुग्णांना निस्वार्थ पणे मदत कार्यात ते कायम पुढे असतात , याचा फायदा आजपर्यंत हजारो रुग्णांना झाला आहे , हे सर्व करत असताना ते कोणाकडूनही कसलीही अपेक्षा करत नाहीत ,
कित्येक गरजू गरीब रुग्णांना मोफत तर काही रुग्णांना जिथे रक्तदात्याची गरज आहे तिथे रक्तदाता पाठवून आपली ही सेवा जपत आहेत , याचीच दाखल देशभरातून घेतली जाते आहे , कारगिल युध्दातील हिरो मेजर दिपचंद दास ज्यांचे दोन्ही पाय आणि एक हाथ कारगिल युद्धात गेला आहे तरी सुद्धा ते आपल्या प्रेरणादायी भाषणा मुळे लोकप्रिय आहेत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे , या 2023 वर्षातील त्यांना मिळालेला हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे असून , 6 जानेवारी 2023 रोजी , कोटा राजस्थान येथे , 11जानेवारी मुंबई येथे , 26 जानेवारी रोजी संत कबीर नगर , उत्तरप्रदेश , आणि आता बिकानेर येथे असे चार राष्ट्रीय पुरस्कार हे गेल्या तीन महिन्यात भेटले आहेत , त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा बद्दल उंब्रज आणि परिसरातून त्यांचे अभिनंदन व विशेष कौतुक केले जात आहे .




















