महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी(सोमेश्वरनगर ) :विनोद गोलांडे
बारामती तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसामध्ये सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रात वादळी वायासह मोठा पाऊस झाल्याने व कारखाना परिसर ऊस बागायत पट्टा असून झालेल्या पाऊसामुळे ब-याच ठिकाणीउभ्या ऊस पीक पडले असुन यामुळेसभासद शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कार्यक्षेत्रात जोवाढलेलला ऊस पडला आहे त्याचे कारखाना विभागाच्याशेतकी खात्याकडुन पाहणी सुरु असुन याबाबतचा अहवाल शेतकी खात्याकडुन लवकरच मिळणार असुन हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संचालकमंडळाच्या बैठकीमध्ये योग्य तो निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहेकी, कारखाना परीसरात वादळी वा-यासह झालेल्यापाऊसामुळे सभासद शेतक-यांच्या ऊस पिकाचे नुकसानझाले. याबाबत शासकीय कृषी विभाग व महसुल विभागाच्या वतीने सर्वेक्षण सुरु आहे परंतु आपल्या शेतकरी बांधवांच्या झालेल्या या नुकसानीचे सर्वेक्षण करणे हे कारखान्याचेहीकर्तव्य असल्याने कारखान्याच्या शेतकी विभागासही याचे सर्वेक्षणकरण्याचे आदेश दिले असुन याबबत लवकरच संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेवु..जगताप पुढे म्हणाले की, येणारा हंगाम सुरु करण्याच्या दृष्टीकोनातुन सर्व कामे गतीने सुरु असुन आपणा सर्वांच्या सहकार्याने येणारा गाळपहंगामही यशस्वीरीत्या पार पाडु असा विश्वास आहे.त्याचसोबत तोडणी वाहतुकीचे करारही कारखान्यामार्फतझाले असुन अॅडव्हान्सदेखील दिला असल्याची माहिती अध्य जगताप यांनी दिली.