बारामती प्रतिनिधी
बारामतीत काल एकूण ९६ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. त्यापैकी प्रतीक्षेत असलेल्या उर्वरित १३ जणांचा अहवाल आता प्राप्त झाला असून त्यामध्ये ११ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आज दिवसभरामध्ये सकाळचे ६ व आत्ताचे ११ असे एकूण १७ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत.त्यामध्ये ग्रामीण भागातील ८ व बारामती शहरातील ९ असे रुग्ण आहेत.






























