महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम २०२० – २१ तयारी केली आहे , त्या अनुषंगाने कारखान्याचे मिल रोलरचे पुजन कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले .
गळीत हंगाम वेळेत चालू करण्यासाठी गाळप क्षमतेनुसार ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे ट्रक – ट्रॅक्टरचे आवश्यक असलेले करार कारखान्याने पूर्ण केल्याची माहिती दिली . या कार्यक्रमास कारखान्याचे संचालक भरत शहा , यशवंत वाघ , राजेंद्र गायकवाड , भास्कर गुरगुडे , राजेंद्र चोरमले , सुभाष काळे , प्रशांत सुर्यवंशी , मानसिंग जगताप , मच्छिंद्र अभंग , विष्णू मोरे , अंबादास शिंगाडे , केशव दुर्गे , वसंत मोहोळकर , अतुल व्यवहारे, सुभाष भोसले , पांडुरंग गलांडे , कार्यकारी संचालक बाजीराव सुतार व सर्व अधिकारी यावेळी उपस्थित होते
































