महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
सोनाई परिवाराचे संस्थापक दशरथ माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोनाई कृषी कारखान्याचा १४ वा गळीत हंगाम सुरू करण्यात येणार आहे . या हंगामात कारखान्याचे दिड लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट बाळगले असून , त्यासाठी आवश्यक ऊस तोडणी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती कारखान्याचे संचालक व पुणे जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य व बांधकाम सभापती प्रविण माने यांनी दिली .
यावेळी बोलताना प्रविण माने यांनी शेतकरी यांना ऊसास योग्य भाव दिला जाईल , व लवकरच हंगामास सुरवात करण्यात येणार असल्याचे सांगितले .
यावेळी अभिमान करे , योगेश देवकर, कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एस.भुंजकर , मुख्य अभियंता सुभाष काळे , उमेश ननवरे, रामहरी माने यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .
































