महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी :
दुर्गादेवी नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून उत्कर्ष हॉस्पिटल कराड यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना महामारी मुळे सर्वसामान्य लोकांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे आपली सामाजिक जबाबदारी समजून डॉ तेजस जाधव. यांनी दुर्गा उत्सवनिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात केले. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी उत्कर्ष हॉस्पिटलचे प्रमुखचे डॉ.तेजस जाधव डॉ. स्मिता जाधव यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती दिली. आज या आरोग्य शिबिराला कराड व कार्वेनाका परिसरातील सर्व महिला मोठ्या प्रमाणात या आरोग्य शिबिराला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.व या शिबिरामध्ये महिलांविषयी वारंवार होणाऱ्या आरोग्याच्या समस्या याचे योग्य ते मार्गदर्शन स्त्रीरोग तज्ञ डॉ. तेजस जाधव यांच्या वतीने महिलांना मोलाची मार्गदर्शन करण्यात आले व या शिबिराचा लाभ मोठ्या प्रमाणावर महिला व कार्वे नाका परिसरातील सर्व नागरिकांना घेतला. या आरोग्य शिबिरामुळे सर्वसामान्य महिलांना फायदा होईल अशी अपेक्षा डॉ तेजस जाधव यांनी व्यक्त केली.
व कराडमधील महिलांनी या शिबिराला आपला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या बद्दल उत्कर्ष हॉस्पिटल कराड चे प्रमुख डॉ तेजस जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.व महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्य विषयी कोणतीही तक्रार असेल तर तुम्ही उत्कर्ष हॉस्पिटल कराडला कधीही भेट देऊ शकता. असे आव्हान डॉक्टर तेजस जाधव यांच्याकडून करण्यात आले






























