आज शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट रोजी फलटणचे तहशिलदार यांना धनंजय महामुलकर सातारा जिल्हा अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी दिलेले निवेदनानुसार १५ ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असलेचे सांगितले आहे.
फलटण तालुक्यातील सोमंथळी येथील शिवाजी धोंडीराम सोडमिसे यांनी पाणंद रस्ता खुला करून देण्याची मागणी केली होती. रस्ता खुला न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे इशारा दिला होता. सदर आंदोलनास शेतकरी संघटनेने पाठींबा दिला होता. तथापि फलटणचे तहशिलदार यांच्या दालनात झालेल्या चर्चेत आंदोलन अर्धन्यायिक असल्याचा निर्णय दिल्याने १५ ऑगस्टला होणारे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले असलेचे महामुलकर यांनी निवेदनाव्दारे म्हटले आहे.