कोरोनाच्या संकटकाळात परीक्षा रद्द करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या संदर्भात सहा राज्यांनी मिळून याचिकादेखील सुप्रीम कोर्टात दाखल केली. मात्र आज सुप्रीम कोर्टाने अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच हा निकाल दिला. या विषयावरून भाजप नेते आणि आ. आशिष शेलार यांनी युवासेना नेते तसेच आ. आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. त्यांनी ट्विट करत बबड्याच्या हट्टापायी राज्यातील विद्यार्थ्यांना नाहक त्रास झाला, असे म्हटले आहे.
काय आहे ट्विटमध्ये
कुलपती म्हणून राज्यपालांना, कुलगुरुंना विश्वासात घेतले नाही, शिक्षण तज्ज्ञांची मते धुडकावली. युजीसीला जुमानले नाही. मंत्री मंडळात चर्चा केली नाही. विद्यार्थ्यांना अखेरपर्यंत वेठीस धरले. अंहकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले. काय साध्य केले? असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला. तर, एका बबड्याच्या हट्टापायी राज्यातील १० लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला.






















