महाराष्ट्र न्यूज कराड प्रतिनिधी : खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कराड आणि पाटण तालुक्यातील सिंचनाच्या 16 कामांसाठी सुमारे 6 कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामाध्यमातून सिमेंट कॉंक्रीटचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या माध्यमातून कराड व पाटण तालुक्यातील शुन्य ते शंभर हेक्टर सिंचन क्षमतेच्या सिमेंट बंधार्याच्या सदर कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामध्ये कराड तालुक्यातील अंतवडी (खिड शिवार) येथील बंधार्यासाठी 32 लक्ष 85 हजार, अंतवडी (पोळ खडी शिवार) बंधार्यासाठी 39 लक्ष 91 हजार, अंतवडी (रत्नकर शिवार) बंधार्यासाठी 51 लक्ष 18 हजार, अंतवडी (टेक शिवार) बंधार्यासाठी 39 लक्ष 91 हजार, अंतवडी ( गुरबकी शिवार) बंधार्यासाठी 36 लक्ष 97 हजार, अंतवडी (नाईकबा मंदिर शेजारी) बंधार्यासाठी 29 लक्ष 14 हजार, अंतवडी (जाळीचे शेत) बंधार्यासाठी 34 लक्ष 3 हजार, डिचोली बाबरमाची ( विठ्ठल कोळेकर विहीर) बंधार्यासाठी 30 लक्ष 99 हजार, वहागाव बंधार्यासाठी 30 लक्ष 52 हजार, अभईचीवाडी बंधार्यासाठी 33 लक्ष 39 हजार, तळबीड बंधार्यासाठी 30 लक्ष 52 हजार निधी मंजूर झाला आहे. पाटण तालुक्यातील टेळेवाडी (टेक शिवार) येथील बंधार्यासाठी 38 लक्ष 43 हजार, टेळेवाडी (दोधानी शिवार) बंधार्यासाठी 37 लक्ष 99 हजार, मालदन (बाधे शिवारच्या मागे) बंधार्यासाठी 41 लक्ष 63 हजार, मालदन (बाधे शिवार) बंधार्यासाठी 53 लक्ष 36 हजार, खळे बंधार्यासाठी 36 लक्ष 87 हजार असे एकूण 5 कोटी 97 लक्ष 75 हजाराच्या निधीस मंजूरी मिळाली आहे.
या जलसंधारणाच्या विकासकामांमुळे कराड, पाटण तालुक्यातील सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे. या निधीसाठी खा.श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री ना.शंकरराव गडाख व जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सु.पा.कुशिरे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यास यश आल्यामुळे संबंधित भागातील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.