महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी सातारा:-
कोडोली परिसरामध्ये सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, कला ,क्रीडा, उद्योग, साहित्य, मनोरंजन, इत्यादी क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा कोडोली कृतज्ञता मंच गेली पंधरा वर्षे स्वातंत्र्यदिनानिमित्त सातत्याने हा उपक्रम करत असून यावर्षी संपूर्ण भारतभर कोरोना सदृश्य परिस्थिती असल्यामुळे यावेळी साध्या पद्धतीच्या कार्यक्रमाचे नियोजन केले असून त्यामध्ये
२०२० चा कोडोली भूषण – मा. डॉ. शैलेश मच्छिन्द्रनाथ जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. तसेच या वर्षी कोडोली भूषण बरोबर कोडोली कोरोना योद्धा म्हणून कोडोली गावचे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी , सर्व आरोग्य सेविका व अशा सेविका आणि सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत सदरचे पुरस्कार हे आपल्याला कोरोना महामारी मुळे एकत्र कार्यक्रम घेऊन देता येत नसल्याने आपण हे पुरस्कार वेगवेगळया ठिकाणी देणार आहोत. अशी माहिती कोडोली कृतज्ञता मंच च्या सभासदांनी यांनी दिली.