निकमवाडी येथे पुष्प उत्पादन तंत्रज्ञान व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला. महाराष्ट्र शासन कृषी विभाग भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, कृषी विज्ञान केंद्र बोरगाव व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांचे संयुक्त विद्यमाने सदर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. विजयकुमार राऊत अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सातारा विजयकुमार राऊत यांनी शास्त्रोक्त पद्धतीने फुल शेती करून उत्पादनवाढीवर भर देण्यास सांगितले. डॉ. श्री गणेश कदम, शास्त्रज्ञ भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, यांनी पुष्प उत्पादन बाबत सखोल मार्गदर्शन केले.तसेच डॉ.श्री.डी. एम.फिरके यांनी एकात्मिक किड व रोग व्यवस्थापन बाबत सखोल मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमादरम्यान प्रगतशील शेतकरी श्री.धर्मराज देवकर यांच्या फुल शेती क्षेत्रास भेट देण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना मा. श्री. प्रशांत शेंडे तालुका कृषी अधिकारी वाई यांनी केले तसेच कृषि विभाग राबवित असलेल्या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच सूत्रसंचालन श्री. प्रदिप देवरे बी. टी.एम आत्मा यांनी केले.
कार्यक्रमास मा. उपविभागीय कृषी अधिकारी, वाई, श्री. चंद्रकांत गोरड, डॉ.श्री नवीन कुमार, डॉ. श्री तारकनाथ शहा, डॉ. श्री.संजय कड शास्त्रज्ञ भा. कृ. अ.प.पुष्प निदेशालय, पुणे, श्री. भूषण यादगिरवार व श्री.संग्राम पाटील विषय विशेषज्ञ, के.व्ही.के. बोरगाव,श्री. शहाजी शिंदे कृषि अधिकारी,ता. कृ.अ.कार्यालय वाई. मंडल कृषी अधिकारी, भुईंज, श्री राजेंद्र डोईफोडे, श्री भाऊसाहेब शेलार व श्री प्रवीण बनकर कृषि पर्यवेक्षक, माजी पं.स. सदस्य श्री.कुमार बाबर, प्रगतशील शेतकरी श्री. चंद्रकांत जाधव, ए.टी. एम. आत्मा योगेश जायकर, कृषि सहाय्यक विजय वराळे,सुजित जगताप, परशुराम गवळी, विनोद शेळके, सुनिल फरांदे,विक्रम मोहिते, उमेश संकपाळ, संतोष नेवसे व सुनिल चौधरी व निकमवाडी परिसरातील फुल उत्पादक शेतकरी उपस्थित होते.