लोक जनशक्ती पार्टी चे युथ जिल्हा उपाध्यक्ष रणजित कसबे यांच्याद्वारे खेड ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या खेड पिरवडी येथील मे. आदर्श (मागासवर्गीय) गृहनिर्माण हाउसिंग सोसायटी खेड पिरवाडी या नावाच्या सोसायटीतील अंतर्गत रस्त्याचे काम अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचे विकास करणे योजना संन २०१९/२०२० अंतर्गत खेड येथील पिरवडी महालक्ष्मी अंतर्गत रस्ता करणे या चुकीच्या नावाखाली मंजूर करून काम पूर्ण करून टाकले आहे.ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केले असल्याने या कामाची व ठेकेदाराची व ठेकेदाराला मदत करणाऱ्या सर्व ग्राम सेवकपासून ते त्या कमी असणाऱ्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे यासाठी लोक जनशक्ती पार्टी चे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र गटविकास अधिकारी वर्ग 1 पंचायत समिती सातारा यांनी १४-८-२०२० रोजी लिखित स्वरूपात सादर कामाची आपले स्तरावरून पाहणी करून केलेल्या कामाचा दर्जा योग्य का अयोग्य आहे याची खात्री करून तसा अहवाल आम्ही आपणास देऊ संबंधित कामात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात येईल असे लिखित पत्र दिल्याने लोक जनशक्ती पार्टी चे उद्याचे आंदोलन स्थगित करण्यात आले…