वालचंदनगर पोलीस स्टेशन येथे मा संदिप पाटील सो. पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण, मा मिलिंद मोहिते सो. अपर पोलीस अधिक्षक सो. बारामती विभाग पुणे ग्रामीण मा नारायण शिरगावकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती यांचे मार्गदर्शनाखाली गेले 1 वर्षापासुन पोलीस स्टेशन मध्ये पोलीस व नागरिक यांचेमध्ये सुसवाद रहावा म्हणुन स्मार्ट पोलीसिग उपक्रम राबविण्यात आलेले असुन त्यामध्ये पोलीस स्टेशन ला येणा-या महिला तक्रारदार या त्यांचे अडी – अडचणी व तक्रारी मांडण्यासाठी व त्याच्याशी सुसावंद रहावा म्हणुन पोलीस स्टेशन भरोसा सेल स्थापन करण्यात आलेला होता. पोलीस स्टेशन ला येणा-या नागरिकांना व तक्रारदार यांचेसाठी पोलीस स्टेशन ला अभ्यागत कक्ष स्थापन करण्यात आलेला असुन नागरिकांना त्यांचे पोलीस स्टेशन चे सर्व कामकाज हे आँनलाईन ( सीसीटीएनएस ) यंत्रनेव्दारे चालुन पोलीस स्टेशन चे सर्व क्राईम कक्ष , मुद्देमाल कक्ष, गोपणीय कक्ष यांचे रेकाँर्ड संगणिकृत केलेले आहे. नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पोलीस स्टेशन RO ची व्यवस्था केलेली आहे. शाळा व काँलेज च्या विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी प्रत्येक शाळा व काँलेजसाठी पोलीस काका व पोलीस दिदी ही संकल्पना राबविण्यात आलेली आहे. त्यामध्ये पुरुष पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी यांनी दररोज शाळेला भेट देत आहेत. त्यामुळे काँलेज मध्ये घडणा-या छेडछाडाली आळा बसलेला आहे. वरील लोकाभिमुख उपक्रम वालचंदनगर पोलीस स्टेशन ला राबवुन भाडेत्तवार असणा-या पोलीस स्टेशनच्या खोल्याचे आधुनिकीकर करुन नागरिकांना जास्तीत जास्त सोई सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे वालचंदनगर पोलीस स्टेशन I.S.O. ( A+ ) मानाकंन मिळुन वालचंदनगर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी श्री दिलीप पवार सहायक पोलीस निरीक्षक यांना दि. 15/08/2020 रोजी मा. अजितदादा पवार सो. उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे हस्ते प्रमाणपत्र देवुन सत्कार करण्यात आला