निनाम तालुका सातारा येथे स्वातंत्र्य दिन ध्वजारोहण उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी ग्रामपंचायत निनाम सरपंच श्री जीवन जाधव यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी,उपसरपंच सौ. प्रमिला महाडिक, ग्रामसेवक सौ.चव्हाण, तलाठी श्री कुंभार, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सुरक्षितता व नियमांचे पालन करत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.