महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी, / ( नेले ): नेले ता . जि. सातारा येथे एका रुग्णाचे कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. अँण्टीजेन टेस्ट कँम्प क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय सातारा येथे घेण्यात आले आहे . त्यामध्ये असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शन मेहता यांनी सांगितले बाधितांमध्ये असणाऱ्या दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. असे सांगण्यात आले आहे. घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. आशासेविका , अंगणवाडी सेविका व मदतनीस , तसेच आरोग्य सेवक चंद्रकांत जाधव, यांनी व कर्मचा -यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्व्हेचे काम सुरूकरण्यात आले आहे. एकूण १२ लोकांचा समूह तयार करून घरोघरी जाऊन सर्वेंक्षणाचे काम सुरु आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक ते उपाय योजना राबवण्याचे काम सुरु आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविकांंनी परिसराची पाहाणी करून उपाय योजना राबवल्या . बाधितांच्या घराशेजारील २५० मीटरचा भाग सूक्ष्म प्रतिबंध कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. ( सरपंच ) सौ. सविता टिळेकर, (उपसरपंच )जावेद फरास , सदस्य प्रकाश जाधव , तलाठी श्री . डी. आय.गीते ग्रामसेवक बाळकृष्ण सावंत, पोलीस पाटील राजेेंद्र गोरे, आरोग्यसेवक चंद्रकांत जाधव , आनंदा कांबळे, महादेव जाधव, सिकंंदर मोकाशी, उपनिरीक्षक देव आदी मान्यवर उपस्थित होते.