महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली असल्याने काल त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रूग्णालयात दाखल करण्यात आले. नामदार बाळासाहेब पाटील यांच्या तब्बेतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा व्हावी म्हणून कार्यकर्त्यांकडून अंतवडी येथील सिद्धनाथ मंदिर , हनुमानगाव येथील मंदिरात होमहवन करण्यात आले. तसेच कोपर्डे हवेली येथील सिद्धनाथ मंदिरात सोशल डिस्टंसिंगचे पालन करत ग्रामदैवताला अभिषेक घालण्यात आला व नामदार साहेब लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा जनसामान्य लोकांच्या सेवेसाठी रुजू व्हावेत, यासाठी ईश्वराकडे साकडे घालण्यात आले.




































