शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, अशी घोषणा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मी या सरकारच्या बाहेर राहीन, मात्र हे सरकारचे काम अधिक प्रभावीपणे काम करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील असेन, असेही त्यांनी स्पष्ट यावेळी फडणवीस म्हणाले की, भाजप शिवसेना युतीचे सरकार बनेल, अशी घोषणा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींनी केली होती. मात्र हिंदुत्वाचा विरोध केला अशा काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली आणि भाजपला बाहेर ठेवले. त्यावेळी जनमताचा अवमान केला. महाविकास आघाडी सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना विरोध केला. त्यातच प्रचंड भ्रष्टाचार पाहायला मिळाला. यासरकारमधील दोन मंत्री मनी लॉड्रींग प्रकरणात जेल मध्ये गेले. दाऊदची संबंधित मालमत्ता खरेदी केली त्या मंत्र्याला अटक व्हावी लागली. ज्यांच्याशी लढलो त्यांच्याशी कसे बसयाचे, कशी कुचंबणा शिवसेना आमदारांची झाली होती. राज्यपालांचे पत्र आल्यानंतर कॅबिनेट घेता येत नाही. काल घेतलेल्या निर्णयावर फेरविचार करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.






















