कराड : हिंदूर्हदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९ व्या समृतीदिना निमित्त शिवसेना कराड तालुक्याच्या वतीने त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
शिवसेनेचे मा. शहर प्रमुख व नगरसेवक प्रमोद वेर्णेकर यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार यावे हे, बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी पुर्ण केले आहे. तसेच आम्ही सर्व शिवसैनिक महाराष्ट्रातील जनतेपर्यंत शासनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत त्या पोहोचवत आहोत. हिच बाळासाहेबांना सर्व शिवसैनिकांकडून खरी श्रध्दांजली वाहत आहोत.
यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख रामभाऊ रैनाक, उपतालुकाप्रमुख काकासाहेब जाधव, शंकर वीर, संजय चव्हाण, सुर्यकांत पाटील,सातारा जिल्हा दक्षता समिती सदस्य राजेंद्र माने, ग्रामपंचायत सदस्य बाबासाहेब बनसोडे, विभाग प्रमुख प्रविण लोहार, निलेश पारखे, दत्तात्रय गायकवाड, महेश निकम, सुनिल पवार, रामभाऊ पवार, यश माने, उल्केश गायकवाड, भिमराव पाटोळे, बापू भिसे, दशरथ धोत्रे, जयंत जगताप आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.
































