पाटण दि. 17 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात रविवारी आलेल्या कोरोना अहवालात ढेबेवाडी येथील तब्बल 14 व्यक्ती पाॅझिटीव्ह आल्याने आत्तापर्यंत एकूण 465 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली आहे. त्यापैकी तब्बल 280 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात 24 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 161 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ढेबेवाडी येथील 35, 18, 17, 46, 52, 43 वर्षीय पुरूष व 37, 40, 32, 16, 12, 38, 55, 46 वर्षे महिला या चौदा व्यक्तींचा अहवाल पाॅझिटीव्ह आल्याने त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या संपर्कातील कुटुंबीय, नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे. सोमवारी पापर्डे येथील पुरूष व पाटण येथील दोन महिला व एक पुरूष अशा चौघांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे.
@ पाटण शहरात आणखी तिघांना कोरोना.
पाटण शहरात कोरोनाचा कहर सुरूच असून आत्तापर्यंत 69 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी बारा व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून यात चौघांचा मृत्यू झाला आहे. सध्या 53 व्यक्तींवर विविध रूग्नालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी नव्याने घेण्यात आलेल्या अॅन्टीजेन चाचणीत रामापूर , चाफोली रोड, देवकांत वस्ती येथील प्रत्येकी एक अशा दोन महिला व एका पुरुषाचा अहवाल पाॅझिटीव्ह आला. शहरातील अन्य हाय रिस्कमधील व्यक्तींचेही स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत त्यांचे अहवाल मंगळवारी रात्री उशिरा येण्याच्या शक्यता आहेत. .






















