प्रतिनिधी : संतोष सुतार
खटाव तालुक्यातील औंध पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत दाखल असलेल्या संशयीत आरोपीला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली होती. अनिकेत काळे (वय 19 वर्षे रा. कोळंबी ता. खटाव) याला न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती. पोलिसांनी काल दुपारी तीनच्या सुमारास सदर संशयीत आरोपीला मेडिकल करण्यासाठी औंध येथील ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेले होते. त्यादरम्यान तो पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.






















