शिक्षक बँकेतील अपप्रवृत्तीना उलथवून परिवर्तनासाठी कामाला लागा : राज्याध्यक्ष उदय शिंदे
पिंपोडे बु।।-प्रतिनिधी
प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक काही दिवसांवर आली आहे. गेल्या सात वर्षातील भ्रष्ट व अनियमित कारभाराला सुज्ञ सभासद कंटाळा आहे. जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली आहे. याकरिता परिवर्तनाचे साक्षीदार होऊन बँकेतील अपप्रवृत्तींना कायमचे बाजूला सारण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे यांनी मेढा येथे भव्य शिक्षक मेळावा प्रसंगी केले.यावेळी जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, जिल्हा सरचिटणीस तथा शिक्षक बँकेचे संचालक किरण यादव, बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने, प्रदीप कदम, अरुण यादव,संजय नांगरे,शिवाजी शिंदे, चंद्रकांत मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.शिंदे पुढे म्हणाले, शिक्षक बँकेमध्ये गरज नसताना अनावश्यक ४३ मुलांची नोकरभरती केली गेली. यातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल एका अपप्रवृत्ती ने केली. समितीने केलेल्या नोकर भरतीतील कर्मचारी आकसापोटी घरी बँकेला तुमची गरज नाही असे सांगितले मग या अनावश्यक नोकर भरती ची गरज कशी भासली असा प्रश्न त्यांनी केला.विद्यमान चेअरमन व सत्ताधारी संचालक यांनी लाखो रुपयांचा मलिदा यामधे खाल्ला. सभासदांना देशोधडीला लागून बँक लुटणाऱ्या या टोळीला कायमचे हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा.असे आवाहन त्यांनी केले.जिल्हाध्यक्ष श्री विश्वंभर रणनवरे यांनी शिक्षक समितीची एकजूट दाखवून जावली तालुक्यातील व जिल्ह्यातील उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचे आवाहन केले.जिल्हा सरचिटणीस तथा बँकेचे संचालक श्री किरण यादव यांनी विद्यमान चेअरमन यांच्या बेकायदेशीर कर्ज प्रकरणाचा पुराव्यासहित पर्दाफाश केला. त्यांनी जोडलेली खोटी कागदपत्रे,कराड शाखेतील बोगस कर्ज प्रकरण, बँकेतील जेवणावळी व चहा पाण्यावर होणारा लाखो रुपयांचा खर्च याबाबतीत जिल्हा उप निबंधक यांच्याकडे तक्रार केली होती. जिल्हा उपनिबंधक यांनी बँकेची चौकशी करून तक्रारीत तथ्य असल्याचे लेखी दिले असल्याचे त्यांनी दाखविले. व्याजदराची टिमकी वाजवणारे यांनी ठेवीचे व्याजदर कुठपर्यंत खाली आणले हे मात्र सभासदांना सांगितले नाही. सर्वच बँकांनी व्याजदर कमी केल्याने आपणच कोणता विशेष पराक्रम केला नसल्याचे श्री यादव यांनी सांगितले. पराभवाच्या भीतीने पायाखालची वाळू सरकू लागल्याने व्याजदराचे आमिष दाखवून सभासदांना भुलवण्याचा केविलवाणा प्रयत्न विद्यमान चेअरमन करत असल्याचा आरोप यादव यांनी केला.सभासद कोणत्याही भूलथापांना बळी न पडता परिवर्तन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
. असा आशावाद संचालक शिवाजी शिंदे,चंद्रकांत मोरे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला.यावेळी शिक्षक बँकेचे माजी चेअरमन विठ्ठल माने यांनी शिक्षक समितीच्या ताब्यात बँक असताना सुरळीतपणे सभासद हित लक्षात घेऊन चालवली जात असते परंतु विरोधी संघटनेकडे बँक असताना सभासद हितापेक्षा स्वहिताकडे जास्त लक्ष दिले जाते असा आरोप केला.प्रदीप कदम यांनी परिवर्तन करण्यासाठी मतभेद विसरून एकजूट दाखवण्याचे आवाहन केले.यावेळी तालुक्यातील 40 ते 50 सेवानिवृत्त शिक्षकांचा शिक्षक समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला. मेळाव्यासाठी महिला भगिनींची उपस्थिती ही चांगली होती. मेळाव्यासाठी अनिल पिसाळ , डी डी ढेबे, बाळकृष्ण कुंभार, अनिल डोईफोडे, तानाजी यादव, भाऊसाहेब दानवले अनिल चव्हाण, नितीन शिर्के, अंकुश नांगरे, महादेव क्षीरसागर यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धिरेश गोळे,शामराव जुनघरे, संपत शेलार, विनायक चोरट, नितीन मोहिते, विजय बांदल, सुधाकर दुंदळे आदींनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुका अध्यक्ष श्री सुरेश चिकणे यांनी केले. आभार प्रदर्शन सरचिटणीस आगुंडे यांनी केले.