पाटण दि. 22 ( प्रतिनिधी ) पाटण तालुक्यात शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या कोरोना अहवालात आणखी पंधरा व्यक्तींना कोरोनाची लागन झाली असून धामणी येथील एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत तालुक्यात एकूण 537 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी तब्बल 346 व्यक्तींनी कोरोनावर मात केली व यात 27 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. सध्या 164 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू असल्याची माहिती उप विभागीय अधिकारी श्रीरंग तांबे व तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. आर. बी. पाटील यांनी दिली.
तालुक्यातील पाटण येथील 55, 25 वर्षे पुरूष, मल्हारपेठ 34 वर्षे पुरूष, मारूल हवेली 55, 38, 58, 22 वर्षे पुरूष, 54, 23, 42 50 वर्षे महिला, चोपदारवाडी 55 , 29 वर्षे पुरूष , 25, 45 वर्षे महिला या पंधरा व्यक्तींना लागन झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रूग्नालयात दाखल करण्यात आले आहे. याशिवाय शनिवारी आणखी 11 व्यक्तींनी कोरोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडून आगामी सात दिवसांसाठी होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. सध्या 164 बाधीतांवर कृष्णा, सह्याद्री हाॅस्पीटल कराड, सिव्हिल हाॅस्पीटल सातारा व कोरोना केअर सेंटर पाटण येथे तर काहींना होम क्वारंटाइन करून त्यांचेवर उपचार सुरू आहेत. बाधीतांच्या संपर्कातील कुटुंबीय व नातेवाईक आदी हाय रिस्कमधील व्यक्तींना इन्स्टीट्युशल क्वारंटाइन करण्यात आले आहे.
@ पाटण शहरात दोघांना कोरोना , दोघांचा मृत्यू .
पाटण शहरात आतापर्यंत 80 व्यक्तींना कोरोनाची लागन झाली त्यापैकी सात व्यक्तींचा मृत्यू झाला. मागील दोन दिवसांत दोन व्यक्तींचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने त्यांचेवर स्थानिक नगरपालीकेकडून कोवीड निकषांनूसार अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आत्तापर्यंत 26 व्यक्तींनी कोरोनावर मात केली असून सध्या 47 बाधीतांवर विविध रूग्नालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी व शनिवारी आलेल्या अहवालात येथील एक पोलीस व एका व्यापारयाला कोरोनाची लागन झाली आहे.