महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी: (नेले )
कळंबे ता . जि. सातारा येथील दोन बाधितांनंतर आता आणखी तीन बाधित सापडले असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. आता येथील बाधितांची एकूण संख्या पाचवर पोहोचली आहे. दोन दिवसांपूर्वी दोन बाधित सापडल्याने येथील हायरिस्क व लोरिस्क अशा २१ लोकांचा अँण्टीजेन टेस्ट कँम्प कण्हेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये घेण्यात आला होता. त्यामध्ये आणखी तीन जण बाधित आढळले आहेत असे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुदर्शनकुमार मेहता यांनी सांगितले बाधितांमध्ये ४० व ६० वय असणाऱ्या दोन महिला व सहा वर्षाच्या एका बालकाचा समावेश आहे.
दोन बाधितांनंतर गावात घरोघरी जाऊन सर्व्हेचे काम सुरू झाले आहे. आशासेविका , अंगणवाडी सेविका व मदतनीस , तसेच आरोग्य सेवक कर्मचा-यांच्या माध्यमातून गावातील प्रत्येक घरी जाऊन सर्व्हेचे काम सुरू आहे. एकूण १२ लोकांचा समूह तयार करून घरोघरी जाऊन सर्वेंक्षण सुरु आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीच्या वतीने आवश्यक ते उपाय योजना राबवण्याचे काम सुरु आहे. आरोग्यसेवक, अंगणवाडी सेविका,आशा स्वयंसेविकांंनी परिसराची पाहाणी करून उपाय योजना राबवल्या . बाधितांच्या घराशेजारील २५० मीटरचा भाग सूक्ष्म प्रतिबंध म्हणून घोषित करण्यात आला आहे.
या सर्व कामात मंडल अधिकारी दत्तात्रय शिंदे,( सरपंच ) सौ. मंगल इंदलकर, (उपसरपंच )धनंजय इंदलकर , सदस्य जगन्नाथ लावंघरे, तलाठी सौ. डी. आय. मुल्ला , ग्रामसेवक प्रशांत फडतरे, पोलिस पाटील विष्णू लोहार , आरोग्यसेवक चंद्रकांत जाधव , संभाजी इंदलकर, प्रकाश चिंचकर , अनिल जायकर, पोलिस हवलदार पाटोळे, छाया सावंत, फुलाबाई सावंत आदी मान्यवर उपस्थित होते.