महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ आणि संविधान परिवार यांचे संयुक्त विद्यामाने विविध सामाजिक राजकीय संघटनाची बैठक समाज कल्याण विभागद्वारा मागासवर्गीय विध्यार्थी यांचेवर होणारा अन्याय विरोधात आंदोलन आणि येणाऱ्या विधानसभेत ओबीसी एस एस टी अल्पसंख्यांक यांचा एकच उमेदवार देण्याबाबत विचार मंथन सभा रवीभावन सभागृह नागपूर येथे मा अरुण गाडे अध्यक्ष कास्ट्राईब यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली
संविधान परिवारचे मा प्रा राहुल मुन, मा गोपाल भारती, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा प्रा रमेश पिसे,ओबीसी जन मोर्चा, मा प्रदीप ढोबळे, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा,आर एस एस चे अब्दुल पाशा, रिपब्लिकन आघाडीचे मा दिनेश गोडघाटे मंचावर उपस्थित होते
संजय रामटेके, राजेश ढेंगरे, अशोक पाटील, विनोद बनसोड, डाँ नारायण सूर्यवंशी, संजय सायरे, रणजित रामटेके, प्रतिभा खोब्रागडे यांचेसह अनेक संघटनाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा राहुल मुन म्हणाले बीजेपी नको म्हणून कांग्रेस आणि महाविकास आघाडीला बहुजनांनी मत दिलीत, लोकसभा निवडणुकीतील मुद्दा वेगळा परंतु आता नरेंटिव्ह बदलले आहे. बहुजनाच प्रतिनिधित्व विधानसभेत असयालाच पाहिजे, या लोकसभा निवडणुकीत दलित – बहुजन समाजाचं नेतृत्व कुठेच दिसलं नाही, म्हणून आमचं लाचार नव्हे प्रखर प्रतिनिधित्व असावे यासाठी ज्यांनी ओबीसी, आदिवासी, बंजारा मुस्लिम आंबेडकरांईट समूहाला एकत्रित करून समाजाच्या प्रश्नासाठी एक लाखाचा मोर्चा काढला, तसेच कामगार व सामाजिक चळवळीत अमूल्य योगदान असणारे कामगार -कर्मचारी नेते अरुण गाडे यांनी नागपूर दक्षिण मतदार संघांचे नेतृत्व करावे,तसेच बहुजन चळवळीत संपूर्ण भारतभर ओबीसी, आदिवासी, दलित यांना संघटित करण्यासाठी संघर्ष करित आहे त्यांनी दक्षिण पश्चिम नागपूर येथून विधानसभेचे प्रतिनिधित्व करावे, संपूर्ण जनता आपल्या पाठीशी उभी होईल याची मी खात्री देतो,
या प्रसंगी प्रदीप ढोबळे यांनी, ओबीसी दलित मुस्लिम समाजाने एकत्र येऊन लढा दिल्यास भारतात परिवर्तन निश्चित होईल, उपस्थितानी टाळ्याच्या गजरात अनुमोदन केले.
मा अब्दुल पाशा यांनी आर एस एस ची भूमिका विशद करून मा अरुण गाडे यांचे पुढाकारात ओबीसी, आदिवासी, बहुजन यांना एकत्रित करण्याची क्षमता आहे, सध्याच्या परिस्थितीत सर्व समाज होऊ शकते.
गोपाल भारती यांनी मा अरुण गाडे व प्रा रमेश पिसे ही जोड समाजाला नवी दिशा देईल.
अध्यक्षीय भाषणात अरुण गाडे यांनी, समाजकल्याण विभाग द्वारा अनुसूचित जातीवारील अन्याया विरोधात आंबेडकरी नेतृत्व मूग गिळून आहे, आमचा विधlद्यार्थी रस्त्यावर येत आहे, शासनाचा माजोरीपणा आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्र भर आंदोलन करू असे म्हणाले.
कार्यक्रमचे प्रस्ताविक मा श्यामराव हाडके, संचालन सिताराम राठोड, आभार रवी पोथारे यांनी केले
संकलन -सिताराम राठोड