महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी :
सरकारी असो की खासगी कामांसाठी आधार कार्ड हा पुरावा मानला जातो. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड गरजेचे आहे. UIDAIने या बायोमेट्रिक डिटेल कार्ड संदर्भात काही अपडेट दिले आहेत. आधार कार्ड असेल आणि त्यात काही बदल करायचा असेल तर आधार केंद्रावर जाऊन वेबसाइटच्या माध्यमातून त्यात बदल करता येते हे सर्वांना माहीत आहे.
UIDAI केलेल्या एका ट्विटमध्ये आधार कार्ड अपडेट करताना एक महत्वाचा बदल केल्याचे सांगितले आहे. यापुढे जर आधार कार्डमध्ये काही बदल करायचे असतील तर त्यासाठी १०० रुपये द्यावे लागतील. आधार कार्डमधील बायोमेट्रिक अपडेटसाठी १०० रुपये तर डेमोग्राफिक तपशील बदलण्यासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.एखाद्या आधार कार्डधारकाला जर त्याच्या डेमोग्राफिक तपशील म्हणजे जन्म तारीखेतमध्ये बदल करायचा असेल तर त्याला त्या संदर्भातील कागदपत्रे जमा करावी लागतील. यासाठी ‘यू आयडीएआय’ने ३२ कागदपत्रांची यादी जाहीर केली आहे. ज्याचा स्वीकार केला जाईल. या कागदपत्रांच्या आधारे आधार कार्डधारक माहिती अपडेट करू शकतो.