नवोदय विद्यालय सैनिक स्कूल परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा असणाऱ्या राजमुद्रा करिअर अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेत यश संपादन केले असून,सैनिक स्कूलच्या निवड झालेल्या अंतिम यादीत आपले नाव निश्चित केले आहे. त्यामध्ये श्रीराज भोसले या विद्यार्थ्याने तर उच्चांक करत नवोदय विद्यालयाच्या, राष्ट्रीय मिलिटरी स्कूल सहित सैनिक स्कूलच्या अंतिम यादीतील नाव निश्चित केल आहे. या विद्यार्थ्यांच्या विशेष यशाबद्दल विराज भोसले यांचे आई-वडील नातेवाईक यांच्याकडून त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले आहे.तसेच सैनिक स्कूल परीक्षेत अंतिम यादीत आपलं नाव निश्चित करणाऱ्या मध्ये मौजे नेले तालुका सातारा या गावचे सुपुत्र पृथ्वीराज संदीप वाघमळे यांची सैनिक स्कूल सातारा येथे निवड झाल्याबद्दल नेले ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन व पुढच्या वाटचालीस शुभेच्छा देण्यात दिल्या आहेत. त्याचबरोबर पृथ्वीराज चे पालक संदीप वाघमळे त्याच्या आई नातेवाईक यांनीसुद्धा यासंदर्भात आनंद व्यक्त करत कौतुकाचा वर्षाव केला आहे. तसेच कुमार सुमित बोलूगे यांनी सुद्धा भरारी घेत सैनिक स्कूलच्या अंतिम यादी मध्ये आपलं नाव निश्चित केल आहे .
राजमुद्रा करिअर अकॅडमी चे विकास जगदाळेसर, संजीता पवार व सर्व शिक्षक शिक्षिका यांनी या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले आहेत.
राजमुद्रा करियर अकॅडमी चा आजपर्यंतचा प्रवास बघितला असता
राजमुद्रा करियर अकॅडमी हे सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील आघाडीची अकॅडमी असून आज पर्यंत गेल्या पाच वर्षात सैनिक स्कूल परीक्षा मध्ये सर्वाधिक 91 विद्यार्थी उत्तीर्ण करणारी एकमेव अकॅडमी आहे.नवीन वर्षामध्ये निवासी मुलांची स्पेशल बॅच करण्याचाही आमचा मानस असून त्याची सुरुवातील आम्ही केलेले आहे. व त्याचे ऍडमिशन प्रोसेस चालू आहे .तसेंच 2020 मध्ये राजमुद्रा करिअर अकॅडमीच्या 32 विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूल परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले असून राष्ट्रीय मिलिटरी स्कूलमध्ये दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.तसेच नवोदय विद्यालयाच्या 2020 च्या पहिल्या यादीमध्ये तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक निकाल देणारी एकमेव अकॅडमी आहे. यावर्षी कोरणा महामारी सारख्या संसर्गजण्य आजारामुळे शाळा बंद असून ही मुले घरीच अभ्यास करत आहेत. या मुलांचं वर्ष वाया जाऊ नये म्हणून आणि पालकांच्या आग्रहाखातर राजमुद्रा करियर अकॅडमी ने डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून ई लर्निंग सुविधा मे महिन्यापासून चालू केली असून त्यामध्ये सैनिक स्कूल पूर्व परीक्षेची तयारी तसेच नवोदय विद्यालय व राष्ट्रीय मिलिटरी स्कूल, कॉलरशिप याचा अभ्यासक्रम रोज नित्यनेमाने रोज तीन तास लेक्चर स्वरूपात घेतला जातो, त्याबरोबर रोजचे रोज नोट्स दिले जातात व आठवड्यातून एकदा चाचणी पेपर सोडवून घेतला जातो त्यात पालक आणि विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळत असून आम्हाला नवनवीन विद्यार्थी आणि पालक संपर्क करत असून त्यांचा आग्रहा खातीर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे डिजिटल क्लासरूम च्या माध्यमातून लेक्चर घेतले जात आहेत. तरी सैनिक स्कूल नवोदय विद्यालय राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्कॉलरशिप साठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थी व पालकांनी आम्हाला खालील नंबर वर संपर्क करून आपल्या पाल्याची जागा निश्चित करावी असं राजमुद्रा करिअर अकॅडमी च्या जगदाळे यांनी आवाहन केले आहे.






















