खासदार उदयनराजेंच्या राजकीय जडणघडणीमध्ये सातारा तालुकातील अनेक ज्येष्ठ व युवा कार्यकर्त्यांची फळी उभी करत असताना राजकीय जडणघडणीचा पाया ज्या मावळ्यांनी भरला त्यापैकी एक युवक कि जो झपाटून काम करत असताना संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये ज्याचे कार्य उठून दिसत होते छत्रपतींच्या आदेशावर जीवाची परवा न करता वाटेल ती भूमिका वटवण्यासाठी चंद्रहार सदैव तयार असायचा उदयनराजेंच्या संघर्षमय राजकारणात ज्या काही अधोरेखित अशागोष्टी घडल्या त्या प्रत्येक मोहिमेत चंद्रहार माने महत्वाच्या भूमिकेत असायचे याबरोबरच संपूर्ण तालुक्यातील तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करत असताना कार्यकर्त्यांची मित्रत्वाची नाळ जोडताना एक मोठा मित्र समूह निर्माण करण्यास ते यशस्वी झाले अत्यंत सामान्य कुटुंबातील हा कार्यकर्ता कोणत्याही पदाची व पद प्रतिष्ठेची अपेक्षा न करता आपल्या सडेतोड वृत्तीने संपूर्ण उदयनराजे समर्थकांतील निष्ठावान मावळा म्हणून नावारूपाला आला होता आशा एका मित्राला की ज्याची आश्चर्यकारकरीत्या या दुनियेतून मनाला मान्य होत नाही अशी एक्झिट झाली यामुळे स्वतः खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे व त्यांचा मित्र समूह अत्यंत शोकाकुल परिस्थितीत असून चंद्रहार माने यांच्या जाण्याने एका सच्चा मावळ्याची न भरून येणारी अशी पोकळी ही सदैव क्षणोक्षणी लक्षात येईल.