महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : प्रतापसिंह भोसले (फलटण शहर)
गॅलेक्सी को.ऑप. क्रेडीट सोसायटी लि. फलटण तर्फे नुकतेच कार लोन व नवीन चारचाकी वाहन खरेदी कर्ज सुरू करण्यात आले असून त्यासाठी पतसंस्थे तर्फे अनेक सूटसुटीत पर्याय देण्यात आले आहेत.
पतसंस्थे तर्फे अत्यंत कमी वेळेत तत्परतेने चार चाकी खरेदी कर्ज देण्यात येत असले मूळे ग्राहक या योजने कडे आकृष्ट होत असलेचे चित्र निर्माण झाले आहे.
संस्थे तर्फे नुकतेच श्री श्रावण चांगभले यांना चारचाकी खरेदी कर्ज देण्यात आले, त्यावेळी त्यांनी
पतसंस्थेमार्फत देण्यात आलेल्या तत्पर सेवे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली व शोरूम मधील व तत्सम कार्यवाहिस संस्थे तर्फे करण्यात आलेल्या मदती बद्दल देखील आभार व्यक्त केले.
संस्थेचे ग्राहक श्री श्रावण चांगभले यांच्या विनंती नुसार त्यांच्या वाहनाचे पूजन काल संस्थे चे चेअरमन व के बी एक्सपोर्टस तसेच के बी बायो ऑर्गनिक्स चे संचालक मा श्री सचिन यादव साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व त्यावेळी चावी प्रदान करण्यात आली.























