महारष्ट्र न्यूज प्रतिनिधी :फलटण
जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशानुसार कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचारासाठी फलटण येथील सुविधा हॉस्पिटल हे पुढील आदेशापर्यंत अधिग्रहित करण्यात आले आहे. डॉक्टर, नर्स व इतर कर्मचारी वर्ग यांच्यासह हे रुग्णालय अधिग्रहित करण्यात असून त्यामध्ये 30 खाटांचे सुसज्ज विलगीकरण कक्ष तयार करून आवश्यक त्या सर्व बाबींची तयारी करण्यात यावी असा आदेश देण्यात आलेला आहे.कोरोना बाधित रुग्णांची फलटण तालुक्यातील संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे अशा कार्यवाहीची आवश्यकता होतीच.





















