विनापरवाना लाकूड वाहतूक करणाऱ्या वाहनावर वनविभागाची कारवाही ट्रॅक्टर आणि ट्रॉलि सहित पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
पिंपोडे बुद्रुक प्रतिनिधी
वाठार वनपरिमंडल यांनी कोरेगाव तालुक्यातील वाघोली ते आंबवडे रोडवरील अनपटवाडी येथुन करंज या लाकडाची विनापरवाना वाहतूक होत असलेबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अनपटवाडी ता. कोरेगाव येथे तपासणी करून वनविभागाच्या वतीने कारवाई करण्यात आल्याची माहिती उप वनसंरक्षक अधिकारी महादेव मोहिते यांनी दिली आहे. या कारवाईत खंडाळा तालुक्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनपटवाडी ता.कोरेगाव च्या हद्दीतून शनिवार दि.२ रोजी रात्री ८ सुमारास ट्रॅक्टर क्रमांक एम एच ११ बी झेड ५५८५ व ट्रॉली या वाहनामधून विनापरवाना करंज लाकूड वाहतूक होत असल्याची माहिती वनविभागाला प्राप्त झाली होती. सदर वाहनाची अनपटवाडी येथे तपासणी केली असता अवैध करंज अनगड माल विना शिक्का आढळून आला.सदर प्रकरणी तांबवे ता.खंडाळा येथील गजानन रामदास सूर्यवंशी यांचेवर करंज लाकूड मालाची विनापरवाना विनापासी अवैध वाहतूक करून महाराष्ट्र वनअधिनियम नियमवाली चे उल्लंघन केल्याने गुन्हा नोंद करणेत आला आहे. वाहतूकीसाठी वापरण्यात आलेले ट्रॅक्टर,ट्रॉली व लाकूडमाल असा पाच लाख रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई उपवनसंरक्षक श्री महादेव मोहिते,सहाय्यक वनसंरक्षक रेश्मा व्होरकाटे मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अधिकारी वैभव घार्गे यांनी वाठार वनपाल एस एस निकम,वनरक्षक बी बी मराडे,श्रीमती एस एस मुंढे, वनमजुर किरण मदने, प्रशांत बोडेरे,महेश चव्हान यांच्याकडून करण्यात आली आहे तसेच पुढील तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल एस एस निकम करीत आहेत.