महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील कुटुंबात कोरोनाची बाधा ५ जणांना झाली. तरी देखील कुटुंबातील सर्वांना धीर देण्यासाठी तो धाकटा भाऊ चालत चालत निघाला…काळजी नको, माघारी येवू असे सांगून गाडीत बसला…तो माघारी आलाच नाही आणि तो आला नाही तर थोरला देखील परतला नाही.
इंदापूर तालुक्यातील वालचंदनगर येथील ही घटना अनेकांच्या काळजाचा ठाव घेऊन गेली. एकाच दिवसाच्या अंतराने दोन सख्ख्या भावांचा मृत्यू होणे व संपूर्ण कुटुंब एका क्षणात दुःखाच्या खाईत कोसळणे ही घटना अनेकांना विचलित करून गेली. कोरोनाने आजपर्यंत इंदापूर तालुक्यात २७ जणांचा बळी घेतला आहे. यामधील दोन भावांचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .