महाराष्ट्र न्यूज इंदापूर प्रतिनिधी : (शहाजीराजे भोसले)
महाराष्ट्र राज्यात चाललेल्या मराठा आंदोलनाची सुरूवात आज इंदापूर तालुका सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने इंदापूर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री ना. दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडी येथील निवासस्थानी आंदोलन करून शुक्रवार , दि.२/१०/२०२० रोजी झाली .
मराठा समाजाला शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षण भेटण्यासाठी सर्वच थरातून प्रयत्न केले जात आहेत आंदोलनाची दिशा बदलू नये , यासाठी स्वतःहा दत्तात्रय भरणे यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने आंदोलनास जाहीर पाठिंबा देखील दिला .
मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध मागण्या संदर्भात सरकार मागण्या पूर्ण करण्यास कटिबध्द आहे . मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकारची भूमिका प्रयत्नशील असून लवकरात लवकर न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत आहे . यापुढील काळातही माझ्याकडून मराठा समाजाला आरक्षण मिळणेकामी प्रयत्न राहील , तसेच मराठा समाजाच्या आरक्षणास माझा पूर्ण पाठिंबा राहिल असेही भरणे यांनी यावेळी सांगितले .