सातारा -जि .प सातारा मधील कारभार हा वर्षानुवर्ष एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेले कर्मचारी चालवत असुन त्या कर्मच्याऱ्यांची मक्तेदारी जि .प . मध्ये झालेली असुन जि . प . मध्ये चुकीची कामे अश्या एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या कर्मच्याऱ्या कडुन होत आहे . जि . प . मधील कारभार सर्व समावेशक चालवायचा असेल तर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्वीय्य सहाय्यक जितेंद्र देसाई पासुन सर्व बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या रद्द कराव्या अशी मागणी सातत्याने कास्ट्राईबचे अजित वाघमारे करीत आहे . याबाबत वारंवार निवेदन देवूनही जि .प प्रशासन बेकायदेशीर प्रतिनियुक्तीस पाठीशी घालत आहे . त्यामुळे कास्ट्राईबने आक्रमक भूमिका घेवून २६ जानेवारी ला प्रथम लाक्षणीक उपोषण केले त्यानंतर ही फक्त प्रशासन खोटी आश्वासने देत होते त्यामुळे अजित वाघमारे यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सा . प्र . यांच्या दालना बाहेर फेब्रुवारी महिन्या च्या प्रत्येक सोमवारी ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिल्या त्यानंतर प्रशासनाच्या वतीने अजित वाघमारे यांना विनंती करून वेळ घेतली पण त्यानंतर ही कारवाई करण्यास जि प प्रशासन निष्फळ ठरले त्यानंतर मात्र फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी दि १२ फेब्रुवारी रोजी इशारा दिल्या प्रमाणे सकाळी ११ वाजता मा . निलेश घुले यांच्या दालना बाहेर ठिय्या आंदोलनास बसले तसे जि . प ‘ मधील काही अधिकाऱ्यांचे ठोके वाढले . त्याची प्रचिती म्हणजे स्वतः उप मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले दोन वेळा खुर्चीतुन उठून अजित वाघमारे यांच्याकडे बाहेर आले आणि हाताला धरून केबीन मध्ये येण्याची विनंती केली त्यावर अजित वाघमारे यांनी आणखी आक्रमक झाले आणि म्हटले की प्रशासनाला वारंवार वेळ देवूनही आता पर्यंत कारवाई का नाही झाली यावर मात्र प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नव्हते . त्यानंतर मात्र उप मुख्य कार्यकारी अधिकारी अजित वाघमारे यांना म्हटले की तुम्ही उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांची काहीच किंमत ठेवत नाही . दोन वेळा मला खुर्चीतुन उठवले . त्यावर वाघमारे म्हटले की तुम्हाला अशी खुर्ची वरून उठण्याची वेळच आली नसती . तुम्ही यापूर्वीच नियमा नुसार कारवाई केली असती तर , तुम्ही बेकायदेशीर प्रतिनियुक्तीना अभय देत आहात असाही स्पष्ट आरोप वाघमारे यांनी उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेवर केला त्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात स्वतः अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मा . महादेव घुले व मा . जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ . महेश खलिपे हजर झाले व पुन्हा अजित वाघमारे यांना विनंती करण्यात आली . त्यास ही अजित वाघमारे यांनी दाद न दिल्याने शेवटी अति . मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी उठून त्यांच्या त्यांच्या केबीन मध्ये गेले . शेवटी मिडीयाला आंदोलनाची सद्य स्थितीकथन केल्यानंतर मा . निलेश घुले यांच्या विनंतीला मान देवून मा .अति . मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात मा .उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा प्र ) व जिल्हा आरोग्य अधिकारी व इतर यांचे समक्ष चर्चा झाली . त्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बेकायदेशीर प्रतिनियुक्त्या व बदल्या याबाबत नुतन मा . मुख्य कार्यकारी यांच्याशी चर्चा करून तत्काळ उचित कारवाई करू असे आश्वासन प्रशासनाने दिल्या नंतर अजित वाघमारे यांनी दि . १२ फेब्रुवारी चे ठिय्या आंदोलन तात्पुरते स्थगीत केले . मात्र दि .१९ फेब्रुवारी पर्यंत सदरच्या प्रतिनियुक्त्या रद्द न झाल्यास पुन्हा सोमवारी ठिय्या आंदोलन चालु राहील व मार्च पर्यंतही कोणतीच कारवाई न केल्यास आंदोलनाचा तिसरा टप्पा म्हणून नाईलाजास्तव मा . उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सा . प्र . ) व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची प्रेत यात्रा जिल्हा परिषद च्या आवारात काढली जाईल . असा गंभीर इशारा दिल्या नंतर मा . अति . मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी असे टोकाचे पाऊल उचलु नका , त्यावर वाघमारे म्हटले प्रशासनाला माहीत आहे की या सर्व प्रति नियुक्त्या ह्या तोंडी आदेशाने आहेत आणि प्रशासनात तोंडी आदेश चालत नाही तरी अश्या बेकायदेशीर बदल्या व प्रतिनियुक्त्यांना अधिकारी का अभय देतात ? यामागे काही अधिकारी अश्या कर्मच्याऱ्यांच्या माध्यमातुन स्वतःचे हात पांढरे करून घेतात का? असा धडधडीत सवाल अजित वाघमारे यांनी केल्या नंतर मात्र प्रशासनाकडे कोणतेच उत्तर नव्हते . चौकट – नुतन महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अश्या बेकायदेशीर बदल्या व प्रतिनियुक्त्या बाबत कठोर कारवाई करून जि . प . मधील मक्तेदारी मोडीत काढली तर सावित्रीमाई च्या जिल्ह्यात या महिला मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पुरोगामी साताऱ्यातील प्रामाणिक कर्मचारी आभार मानतील . कारण वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करण्याऱ्या कर्मचाऱ्यांना प्रतिनियुक्तीवरून हटवल्यास जिल्हा परिषद मध्ये खऱ्या अर्थाने बहुजन हिताय बहुजन सुखाय चे दिवस येतील हे मात्र निश्चीत
































