महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : शहाजीराजे भोसले (कळंब – इंदापूर)
संपूर्ण देशामध्ये मंदिरे व धार्मिक स्थळे उघडी असताना , महाराष्ट्र राज्यातच मंदिरे व धार्मिक स्थळांना उघडण्यास बंदी घालण्यात आली आहे , ही निषेधार्ह बाब आहे . राज्य शासनाने जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता तात्काळ मंदिरे सुरू करण्यास परवानगी द्यावी , अशी मागणी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे .
श्रीक्षेत्र नीरा नरसिंहपूर (ता.इंदापूर) येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री लक्ष्मी- नृसिंह मंदिरासमोर शनिवारी (दि.२९) राज्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास राज्य सरकारने परवानगी द्यावी , या मागणीसाठी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली घंटानाद आंदोलन करून ‘उद्धवा दार उघड ‘ अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली .
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या केंद्र सरकारने देशातील मंदिरे व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिलेली आहे , त्यामुळे तिरुपती बालाजीसह देशभरातील मंदिरे व धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत . राज्यात इतर सर्व व्यवहार सुरू असताना फक्त मंदिराचे दरवाजे राज्य शासनाने बंद केले आहेत . मात्र राज्यातील सर्व मंदिरे जनतेला दर्शनासाठी उघडण्यासाठी राज्य सरकारला भाजप भाग पाडले .
मार्च महिन्यांपासून मंदिरे बंद असल्याने मंदिरे असलेल्या गावातील हजारो लोकांची उपजीविका धोक्यात आली आहे, त्यामुळे शासनाने नियम व अटी घालून मंदिरे व धार्मिक स्थळे जनतेसाठी खुली करावीत,अशी मागणी हर्षवर्धन पाटील यांनी केली आहे .
यावेळी बोलताना हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्यातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावास तालुक्याचे लोकप्रतिनिधी असलेले निष्क्रिय मंत्री जबाबदार असल्याची टीका केली . तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मंत्र्याकडे नियोजनाचा अभाव आहे तसेच कोरोना रुग्णांना सुविधा उपलब्ध करून देण्याकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, अशी टीका केली .
यावेळी धार्मिक संघटनांच्या वतीने मंदिरासमोर भजन करण्यात आले. श्री लक्ष्मी- नरसिंह देवस्थान हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे .
यावेळी इंदापूर तालुका भाजपचे नूतन अध्यक्ष शरद जामदार , तानाजी थोरात , मारुती वनवे, ह.भ.प.अंकुश रणखांबे , सचिन सावंत यांची भाषणे झाली . या आंदोलनामध्ये नीरा-भीमा कारखान्याचे संचालक उदयसिंह पाटील , मयूरसिंह पाटील , महेंद्र रेडके , महादेव घाडगे , किरण पाटील, श्रीमंत ढोले , अमरसिंह पाटील , युवराज मस्के , मनोज पाटील, राम आसबे , हरिभाऊ घोगरे , बाळासाहेब मोहिते , नाथाजी मोहिते , आण्णा काळे , राजेंद्र मोहिते , हनुमंत काळे , संतोष मोरे , विलास ताटे , किशोर मोहिते , पवन घोगरे, सुभाष काळे, शंकर घोगरे, प्रदीप बोडके , अभय वांकर , भाजप कार्यकर्ते , ग्रामस्थ व धार्मिक क्षेत्रातील मंडळींनी सहभाग घेतला .