महाराष्ट्र न्युज कराड प्रतिनिधी. :
कराड शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार प्रशांत पाटील यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड झाली आहे. त्यांना पुढील पोलिस उपनिरीक्षक पदाच्या प्रशिक्षणासाठी नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीत रवाना करण्यात आले आहे. प्रशांत पाटील यांचे मूळ गाव तांबवे (ता. कराड) हे आहे.
प्रशांत पाटील यांचे शिक्षण पहिली ते सातवीपर्यंतेच शिक्षण आरेवाडी गावात तर आठवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण तांबवेतील स्वातंत्र्यसैनिक अण्णा बाळा पाटील विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर बापुजी साळुंखे महाविद्यालयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर 1 फेब्रुवारी 1994 रोजी ते जिल्हा पोलिस दलात रुजू झाले. त्या वेळी तत्कालीन पोलिस अधीक्षक अशोक कामटे यांच्यासमवेत त्यांनी काम केले. त्यानंतर त्यांनी पोलिस मुख्यालय, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सातारा तालुका पोलिस ठाणे, कराड तालुका पोलिस ठाणे, सातारा वाहतूक शाखा येथे काम केले. सध्या ते शहर पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
शाखा येथे काम केले. सध्या ते शहर
पोलिस ठाण्यात कार्यरत होते.
प्रशांत पाटील यांनी पोलिस खात्यांतर्गत विभागीय पोलिस उपनिरीक्षक पदासाठी परीक्षा दिली होती. त्यामध्ये त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली आहे. त्याबाबतचे पत्र पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी त्याला दिले आहे. श्री. पाटील यांच्या निवडीबद्दल पोलिस अधीक्षक शेख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक बापू बांगर, पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. ते नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमीत पोलिस उपनिरीक्षक पदासाठीच्या मूलभूत प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत.