महाराष्ट्र न्यूज लोणंद प्रतिनिधी : बिलकीस शेख
कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात असताना विविध घटकांतील नागरिकांना उदरनिर्वाह बरोबरच कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक खर्च करणे खुपच जिकिरीचे झाले आहे.

यापुर्वी विविध दानशूर मान्यवरांचे सहकार्याने साथ प्रतिष्ठाण माध्यमातून अशा प्रतिकूल परिस्थितीत शिकण्याची जिद्द असलेल्या 08 विद्यार्थ्यांना शालेय दत्तक घेतलेले असताना याच उपक्रमाची प्रेरणा घेत साथ प्रतिष्ठाण माध्यमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुलींची यामधील शिक्षक धनंजय जाधव सर (वाढदिवस दिनांक – 02 आॅक्टोंबर ) व त्यांच्या पत्नी याच शाळेतील शिक्षिका सौ.मृणाल जाधव (वाढदिवस दिनांक – 05 आॅक्टोंबर ) या दोन्ही शिक्षक दांपत्यांनी त्याच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणंद मुलींची याठिकाणी प्रतिकुल परिस्थितीत इयत्ता 04 थी मध्ये शिकत असलेल्या कु.अंकिता पप्पू खुशवाह या विद्यार्थीनीचा संपुर्ण वर्षाचा शालेय खर्च उचलला व सदर मुलीस शालेय साहित्य भेट देऊन शालेय दत्तक घेत आपला संयुक्त वाढदिवस साजरा केला यावेळी साथ प्रतिष्ठाण चे अध्यक्ष कय्युम मुल्ला, सचिव मंगेश माने, उपाध्यक्ष दिपक बाटे, अनिल बाबर तसेच पालक उपस्थित होते.






















