सांगली शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळे याचा खून झाला होता. 6 नोव्हेंबर 2017 संशयावरून अटक केलेल्या अनिकेत कोथळे याला पोलिसांनी तपासाच्या नावाखाली अमानुष मारहाण केली होता. त्यातच अनिकेतच मृत्यू झाला. त्यानंतर संबंधित संशयितांनी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.
अनिकेत कोथळे प्रकरणी आरोपी क्र.१ युवराज बजरंग कामटे यांची साक्ष , सांगली पो. अधिक्षक कार्यालय, सांगली शहर, सांगली ग्रामीण, पो. स्टेशन, सावंतवाडी पो-उप अधिक्षक, तहसीलदार मिरज जन माहिती अधिकारी तथा पोलीस अधिकारी या सहाही जणांची साक्ष बचाव पक्षातर्फे ॲड विकास बा. पाटील-शिरगांवकर घेणार आहेत. सदरकामी विशेष सरकार वकील ॲड उज्ज्वल निकम यांनी त्यांचा पुरावा मागणी मान्य केली आहे. बचाव पक्षातर्फे आरोपी हे बचावाचा महत्वाचा मुद्दा त्या साक्षी मधून पुढे आणणार असून विशेष सरकारी वकील त्या साक्षीदारांचा उलट तपास घेणार आहेत. सदर कामी२६/८/१०२४ रोजी युवराज कामटे याची साक्ष घेण्यावर नेमले असून बचाव पक्षा तर्फे आता नवीन वळण काय समोर येणार याची चर्चा जन माणसांत व वकीलांमध्ये मध्ये सुरू आहे.